By निवेदिता मदाने-वैशंपायन

@maharashtracity

राज्याचा चित्ररथाचे दर्शन जेव्हा दिल्लीच्या राजपथावर (Rajpath of Delhi) होते तेव्हा थोरामोठयांसह सर्वांचा ऊर भरून येतो. यासाठी शासकीय यंत्रणा कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा करीत असते. यामध्ये राज्याचे सांस्कृतिक संचलनालयांच्या अनेक बैठकातुन खल निघत असतो. अनेक विषयातून किमान पाच-सहा विषय अंतीम केले जातात. त्यानंतर केंद्रीय संरक्षण विभागात बैठकी होत असतात. शेवटी एक विषय फायनल केला जातो. याचा प्रवास सुरू होतो तो रेखाचित्र आणि त्रिमितीय प्रतीकृतीपासून (three dimensional prototype)

हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सर्वच काही विशेष- आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. या वर्षीचा चित्ररथाचा (tableaux) विषयही असाच विषेश- वेगळा आहे. तो म्हणजे. ‘महाराष्ट्राची जैवविविधता मानके’ या अभ्यासपुर्ण विषयावर आहे. याचा थेट संबंध रोजच्या रोज येत नाही. मात्र, जीवन जगतांना किती महत्वपूर्ण परिणाम जीवनावर करतो हे लक्षात येते.

महाराष्ट्रातील काही ठळक भागांमध्ये जैवविविधता (bio diversity) मोठया प्रमाणात दिसून येते. या विषयावर महाराष्ट्र (Maharashtra) जागरूक तर आहेच याशिवाय पर्यावरणाशी (environment) निगडीत बाबींचे संरक्षण करणा-यांसाठी ठोस पाऊले ही उचल्याचे द्योतक आहेत जणू याचीच प्रच‍िती चित्ररथात दिसते आहे.

चित्ररथात युनेस्कोने (UNESCO) मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा (Kas Plateau) समावेश आहे. ‘शेकरू’ (Shekaru – Ratufa Indica) हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ (Hariyal) हे विशेष असलेले पिवळे कबुतर राज्यपक्षी म्हणून केले आहे.

‘ब्ल्यू मॉरमॉन’ (Blue Morgan) या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू (Butterfly) म्हणून घोषणा महाराष्ट्राने केली आहे. राज्यफुल ‘ताम्हण’, कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’, राज्यवृक्ष ‘आंबा’, दुर्मिळ ‘माळढोक’ पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली ‘खेकड्या’ची तसेच, मासा प्रजाती, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड अशी जैवविविधता चित्ररथावर दिसणार आहेत.

अशा अभूतपुर्व विषयावर चित्ररथ तयार करणे हे ही तेवढेच जिकरीचे आणि शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. ‘जैवविविधता मानके’ या विषयावर संकल्पना रेखाचित्र व त्रैमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या तरूण मूर्तीकार व कलादिग्दर्शक यांनी केले. ते केवळ २३-२४ वय वर्षांचे आहेत.

यासोबतच यावर्षीचे हे कार्य शुभ ऍड्स हे करीत आहेत. शुभचे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे आणि राहूल धनसरे त्यांच्या ३० मूर्तीकार व कलाकारांसह भव्य प्रतिकृतीचे काम प्रत्यक्ष दिल्लीतील रंगशाळेत सांभाळले.

यावर्षी निर्सागाची मेहरबानी ही इतकी झाली की, सतत तीन दिवस पाऊस आल्याने रंगशाळेत पूर्ण पाणी साचले होते. काम पूर्णतः बंद होते, तरी वेळेत सर्व काम पूर्ण केले. हे सर्व पडदयामागचे सैनिक आहेत.

राजपथावर महाराष्ट्राचा जैवविविधता हा चित्ररथ बघतांना या पडदयामागच्या कलाकारांचीही आठवण जरूर असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here