@maharashtracity

२४ तासात तब्बल १० हजाराने घट

मुंबई: राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी तब्बल १० हजार कोरोना रूग्ण संख्या घटली (drop-in corona patients) असल्याचे समोर आले. रविवारी राज्यात ४४,३८८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर सोमवारी ३३,४७० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे कोरोनाला उतरंड सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, हीच स्थिती मुंबईतदेखील (Mumbai) आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,५३,५१४ झाली आहे. आज २९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६६,०२,१०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९५% एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण २,०६,०४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यात आज ८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,५३,५१४ (९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमिक्रोन बाधेत ही घट

राज्यात ३१ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण (omicron patients) रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NIV) यांनी रिपोर्ट केले आहेत. या३१ रुग्णात पुणे मनपा – २८, पुणे ग्रामीण -२, पिंपरी चिंचवड –१ असे आहेत.

तसेच आजपर्यंत राज्यात एकूण १२४७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ४६७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत ५ हजाराने घट

मुंबईत मागील आठवड्यात सतत वीस हजारांपर्यंत गेलेली काेराेना रुग्ण संख्येत साेमवारी कमालीची घट झाल्याचे दिसून आली. मुंबईत साेमवारी १३,६४८ काेराेनाचे रुग्ण आढळून आले. रविवारी १९,४७४ रुग्ण आढळले.

मागील आठवड्यात मंगळवारी १०,८६० रुग्ण आढळले असताना बुधवारी १५,१६६, गुरुवारी २०,१८१, शुक्रवारी २०,९७१, तर शनिवारी २०,३१८ रुग्ण आढळले असल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मुंबईत आता एकूण रुग्णसंख्या ९,२८,२२० झाली आहे.

साेमवारी २७,२१४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ८०५,३३३ झाली. एकीकडे मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत असताना साेमवारी ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १६,४११ आहे. मुंबईत सध्या १,०३,८६२ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here