@maharashtracity

दिवसभरात १० लाख ९६ हजार लसीकरण

मुंबई: राज्याने शनिवारी लसीकरणात मोठी कामगिरी बजावली असून दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम (record break vaccination) नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण (vaccination) करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामगिरी केल्याने आरोग्य यंत्रणेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राज्याला लस उपलब्ध झाल्यास दिवसभरांत १० लाखाहून अधिक लसीकरण केले जाऊ शकते हे सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) दाखवून दिले. दरम्यान आरोग्य विभागाची याहीपेक्षाही अधिक लसीकरणाची क्षमता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले. विभागाच्यावतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सातपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविल.

आता राज्यातील आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश (UP) पाठोपाठ महाराष्ट्रानेही (Maharashtra) विक्रमी कामगिरी केली आहे.

शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती. त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला.

शनिवारच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here