@maharashtracity

राज्यात ३३,९१४ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई: राज्यात मंगळवारी ३३,९१४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असली तरी राज्यात मंगळवारी एकूण ३,०२,९२३ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरू शकते का यावर विचार केला जात आहे. दरम्यान, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patients) एकूण संख्या ७५,६९,४२५ झाली आहे. तर काल ३०,५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७१,२०,४३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०७% एवढे झाले आहे.

तसेच राज्यात मंगळवारी ८६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,३६,८४,३५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७५,६९,४२५ (१०.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,२०,३७१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३५८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत १८१५ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १८१५ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०३७५८७ रुग्ण आढळले. तसेच १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील (Mumbai) एकूण मृत्यूची संख्या १६५५६ एवढी झाली आहे.

मंगळवारी १३ ओमीक्रॉन बाधित

राज्यात काल १३ ओमीक्रॉन संसर्ग (Omicron patients) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकिय महाविद्यालय (BJ Medical College) यांनी रिपोर्ट केले आहेत. यां १३ रुग्णांमध्ये पुणे मनपा १२ तर पिंपरी चिंचवड मनपात १ असे असल्याचे सांगण्यात आले.

आता आजपर्यंत राज्यात एकूण २८५८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले. यापैकी १५३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ६३२८ नमुने जनुकीय तपासणीसाठी (Genome Sequencing) पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६२३६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९२ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here