@maharashtracity

ओपीडीत शुकशुकाट

राज्यात डॉक्टरांचे रक्तदान,सफाई मोहीम विविध उपक्रम

मागण्यांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री-वरिष्ठ अधिकाऱ्यांबराेबर चर्चा नाही

मुंबई: कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने १ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शनिवारी संपाचा दुसरा दिवस असून निवासी डाॅक्टरांच्या मागण्यांसंदर्भातील चर्चेसाठी वैद्यकीय मंत्री व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अद्याप वेळ दिला नसल्याचे मार्ड संघटनेचे म्हणणे आहे. ज्यामुळे संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशी देखील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची बाह्य रुग्ण कक्षात (ओपीडी) नियुक्ती केली. मात्र २ ऑक्टाेबर सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका रुग्णालयात शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान, सायंकाळी उशिरा इंटर्न डॉक्टरांच्या अस्मी संघटनेने तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने मार्डच्या काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला. (IMA and ASMI extended support to strike by MARD)

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या दिलेल्या आश्वासनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मध्यवर्ती मार्ड संघटनेने बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Also Read: दोन्ही डोस घेऊनही २९ डॉक्टर पॉजिटीव्ह

संध्याकाळी उशीरापर्यंत प्रतिनिधींना बाेलविण्यात आले नसल्याचे मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे यांनी सांगितले.

“वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी देखील अद्याप चर्चेसाठी वेळ दिली नाहीये. आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबराेबरही चर्चा करण्यास तयार आहाेत”, असे डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे म्हणाले.

सरकार सकारात्मक आहोत असे वारंवार सांगितले जाते. मात्र त्याबाबत लिखित स्वरूपात काही मिळत नाही ताेपर्यंत संप सुरुच राहणार डॉ. ढोबळे पाटील म्हणाले.

२ ऑक्टोबरच्या गांधी जयंती निमित्त निवासी डाॅक्टरांकडून विविध उपक्रम शनिवारी गांधी जयंती निमित्त निवासी डाॅक्टरांनी राज्यभर विविध उपक्रम राबविला आहे. नागपूर, अंबेजाेगाई, यवतमाळ, नांदेड या सरकारी रुग्णालयात निवासी डाॅक्टरांनी रक्तदान शिबिरांचे आयाेजन केले हाेते.

तर राज्यातील इतर सरकारी रुग्णालयात निवासी डाॅक्टरांनी साफसफाई अभियानाचे आयाेजन करण्यात आले असल्याचे मध्यवर्ती (सेंट्रल) मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे यांनी सांगितले.

या आंदोलनाची सुरुवात ओपीडीपासून करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून केईएम, नायर, सायन आणि जे.जे. रुग्णालयासह राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारला.

या संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील ओपीडीतील कामकाज हे निवासी डॉक्टरांमार्फतच चालते. त्यामुळे ओपीडीवर परिणाम होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शनिवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पालिका ओपीडीत शुकशुकाट दिसून आला.

डाॅक्टरांच्या मागण्या:
-कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे दिलेले आश्वासनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष प्रमुख मागणी
-काेराेना काळात डाॅक्टरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष
-निवासी डाॅक्टरांच्या राहण्याची वसतिगृहांची दुरावस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here