Twitter @maharashtracity

धुळे: सॅनिटरी पॅडची वाहतूक करीत असल्याचा बनाव करून बनावट दारूची वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून सात लाख ८१ हजार ८० रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू, सॅनेटरी पॅड, दोन मोबाईल व मालमोटार असा सुमारे १८ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्वी (ता.धुळे) कडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद मालमोटार (क्र.युपी ८०/एफटी-९३९८) पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान (ता.धुळे) शिवारात अडवली. यावेळी वाहन चालक अर्जून रामजित बिंद (वय-24) रा. शेखाही पोस्ट अधनपूर, (ता. शहागंज जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) व सोमनाथ नाना कोळी (वय-26) रा. खामखेडा (ता. शिरपूर) जि. धुळे यांना वाहनातील मालाबाबत विचारपूस करण्यात आली. 

वाहनामध्ये सॅनिटरी पॅड असल्याचे सांगून तशी बिल्टी दोघांनी पोलीसांना दाखविली. तथापि पोलीसांनी वाहनामधील मालाची प्रत्यक्ष तपासणी केली असता सात लाख ८१ हजार ८०० रूपये किमतीच्या देशी-विदेशी कंपनीच्या व्हिस्की दारूचे एकूण २०५ खोके आढळले. या खोक्यांमध्ये सहा हजार ८०४ नग बॉटल आढळल्या. या शिवाय ४० हजार ८०० रूपये किंमतीचे टूरबो प्रिमीयम बियर ट्रॉगचे २० खोके आढळले. या खोक्यांमध्ये ८४० बाटल्या बॉटल असल्याचे आढळले. या कारवाईत पोलीसांनी १२ हजार रूपये किंमतीच्या सॅनिटरी पॅडच्या १२० गोण्या आणि दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल संच तसेच दहा लाख रूपये किंमतीची मालवाहू आयशय असा एकूण १८ लाख ४४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड व अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप व किशोर पाटील यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here