Twitter: @maharashtracity

मुंबई: सांताक्रुझ जुहू कोळीवाडा समुद्रात मुले बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली आहे. यातील एकाला स्थानिकांनी वाचवलं आहे. मात्र चार जण बेपत्ता होते. त्यांचा शोध लागला असून पालिकेच्या कुपर रुग्णालयात या चौघांना मृतावस्थेत आणण्यात आले. दरम्यान आता शोधकार्य थांबल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास १२ ते १५ वयोगटातील मुले पोहण्यास गेली होती. त्यावेळी किनाऱ्यापासून अर्धा किमी अंतरावर समुद्रात ही मुले बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळाचा हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मात्र, सुचनांना न जुमानता ही मुले पोहण्यास गेली. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन आणि नौदलाकडून चौघांचा शोध सुरू झाले. यातील एकाला स्थानिकांनी वाचवले. पालिकेने दिलेल्या माहिती प्रमाणे धर्मेश वालजी फौजीया, शुभम योगेश ओगनिया, जय रोशन ताजभारिया आणि मनिष रोशन ओगनिया हे चौघेही १६ वर्षाचे आहेत. त्यांना मृतावस्थेत कुपर रुग्णालयात आणण्यात आले असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here