डेंग्युच्या चार सिरोटाईपमुळे चार वेळा संसर्ग होण्याची शक्यता

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागात सध्या डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ (hike in patients of dengue and malaria) झाली असल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात दररोज किमान एक ते दोन डेंग्यू रुग्णांची नोंद होत असताना आता रोजची संख्या वाढली आहे. यात बहुतांश प्रवासी रुग्ण असून साथीच्या आजारांना पुरक असलेल्या वातावरणाचे कारण तज्ज्ञ डॉक्टर सांगत ओहत. त्यामुळे आगामी काही काळात हे रुग्ण वाढण्याचा इशारा डॉक्टर देत आहेत. तसेच गंभीर बाब म्हणजे डेंग्यूचे चार सेरोटाइप असून एका व्यक्तीला आयुष्यात चार वेळा संसर्ग होऊ शकतो. हे चारही सेरोटाइप भारतात सक्रिय असल्याच्या गंभीर बाबीचा इशारा पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिला आहे.

दरम्यान, पावसाळ्यातील साथीचे आजार पाऊस नसतानाही पसरत असल्याचा इशारा दिला जात आहे. रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण कक्षातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात दररोज पाच ते दहा रुग्णांमध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळून येत होती. यातील काही रुग्णांना प्लेटलेटच्या कमी झाल्याची तक्रार आढळली. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्याइतपत स्थिती पोहचली होती. यावर भाटिया हॉस्पिटलचे डॉ. सम्राट शाह यांच्या मते, त्यांनी अलिबागहून आलेल्या दोन रुग्णांवर उपचार केले. डास चावल्यामुळे आणि पाणी साचल्यामुळे त्यांना डेंग्यू झाला असण्याची शक्यता आहे. तसेच त्यात व्हायव्हॅक्स मलेरियाची दोन – तीन रुग्ण देखील आढळले. एका ९० वर्षीय महिलेला उच्च दर्जाचा ताप आल्याने तिला चयापचयाच्या तक्रारीमुळे हृदयाचे ठोके वाढल्याच्या तक्रार करण्यात आली. तिच्यावर उपचार करण्यात आले.

तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या सहा महिन्यांत शहरात डेंग्यूचे ५०० हून अधिक रुग्ण आढळले असल्याचे सांगितले. शिवाय शहराच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः उपनगरांमध्ये सांडपाण्याचे डबके आणि बांधकाम क्षेत्र डास प्रजननासाठी पोषक असल्याने डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आधीच वाढ झाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here