उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढत असताना वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेचे विकार तसेच आजारही वाढत आहेत. या उष्णतेचा फटका राज्याला बसला असून उष्माघातामुळे राज्यात जानेवारी २०२३ ते आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. तर संशयित उष्माघाताचे रुग्ण २६४९ इतके आढळले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ही माहिती १९ जून पर्यंतची असून मे महिन्यात संशयित उष्माघाताचे रुग्ण दोन हजाराच्या घरात होते अशी नोंद सांगते.

गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहेत. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरिराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले तर ते सुर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात विविध पातळीवर दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here