मंगळवारी पावसाचा अंदाज

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईतील उष्णतेला सुरुवात झाली असून सोमवारी मुंबईत 39.3 डिग्री सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. यामुळे असह्य उष्मा सहन करावा लागला. तर सायंकाळी वातावरणात बदल होऊन हवा स्तब्ध झाली होती. दरम्यान, मंगळवारी मुंबईत पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या मोसमातील मुंबईतील कमाल तापमानाची नोंद मार्च महिन्यातील सर्वाधिक होती. मात्र यापूर्वी ही याहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मात्र ती नोंद मार्च मध्यनंतरची आहे. अधिकृत माहिती नुसार १७ मार्च २०११ या दिवशी ४१.३ डिग्री सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंद आहे. तर २०२१ च्या मार्च महिन्यात ४०.९ डिग्री सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आले होते. तसेच 2021 च्या मार्चमध्ये 40.9 डिग्री सेल्सियस, 2019 मार्च 40.3, 2018 मार्च 41, 2015 मार्च 40.9 आणि 2013 च्या मार्चमध्ये 40.5 डिग्री सेल्सियस अशी नोंद सांगण्यात आली.

पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तसेच समुद्राकडून येणारे थंड वारे उशिरा वाहल्याने आज कमाल तापमानाचा पारा वाढला होता. मात्र मंगळवारी मुंबईत पावसाची शक्यता असल्याचे मुंबई वेधशाळेच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here