Twitter : @maharashtracity

मुंबई

मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या साप्ताहिक साथरोग आजाराच्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मलेरिया उच्चांकी दिसून येत आहे. तसेच सुरु असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्याची मागील जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याशी तुलना केल्यास डेंग्यू, लेप्टो आणि गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आली असल्याचे आरोग्य विभाग कबुल केले आहे. त्यामुळे मलेरिया रुग्णसंख्या अधिक दिसली तरी देखील डेंग्यू, लेप्टो, आणि गॅस्ट्रोचे मुंबईकरांना आव्हान असल्याचेच दिसून येते.

दरम्यान १ ते ६ आँगस्ट या कालावधीत मुंबईत मलेरिया म्हणजे हिवताप २२६, लेप्टो ७५, डेंग्यू १५७, गॅस्ट्रो २०३, हेपेटायटीस ६, चिकनगुनिया ९ तर एच१एन१ ५६ अशी रुग्णांची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार पहिल्या क्रमांकावर मलेरिया असून गॅस्ट्रो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर डेंग्यू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ही रुग्णसंख्या महापालिकेचे रुग्णालये, दवाखाने, एचबीटी क्लिनिक, अतिरिक्त खासगी प्रयोगशाळा आणि खासगी रुग्णालये असा सर्वकष आरोग्य ठिकाणांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर साथरोग प्रतिबंधासाठी महापालिकेने २ लाख २२ हजार ५०० घरांना भेट देत ११ लाख १२ हजार ५०० तापग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण केले. यातील २७ हजार ९२३ जणांचे रक्तनमुने घेण्यात आले. तसेच १ हजार ९२४ जण लेप्टो बाधित आढळले असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here