@maharashtracity

धुळे: मोबाईल दुकाने फोडून चोर्‍या करणारी एक आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यात धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

पिंपळनेर येथील चोरी प्रकरणी पथकाने साक्री तालुक्यातील वर्सा गावाजवळ काल सापळा लावून तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून मोबाईलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दिनांक २९ ऑगस्ट रोजी विशाल बळीराम बागुल रा. वर्धमान हॉस्पिटलसमोर पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे यांचे कुडाशी गावातील श्री मोबाईल नावाचे दुकानात अज्ञात इसमांनी त्यांचे दुकानाचा मागील बाजुचा पत्रा उचकावुन आत प्रवेश करून विविध कंपनीचे एकुण ११ मोबाईल चोरुन नेले.

याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्हयाचा समांतर तपास स्था.गु.शा. कडुन सुरु असतांना दिनांक ९ सप्टेंबर रोजी पो. निरी. शिवाजी बुधवंत, यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, काही संशयीत इसम पिंपळनेर गावात मोबाईल विक्रीसाठी येणार आहे.

अशी माहिती मिळाल्याने पो.निरी. बुधवंत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पिंपळनेर येथे रवाना केले होते. पथक संशयीत इसमांचा शोध घेत असतांना दिनांक १० रोजी एलसीबी पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, तिन इसम गुजरात हद्यीतुन पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील वार्सा गावामार्गे पिंपळनेर येथे मोबाईल विक्री करण्यासाठी येत आहेत.

त्यावरुन एलसीबी पथकाने वर्सा गावाजवळ सापळा लावला. गुजरात राज्यातुन तीन इसम पिंपळनेर येथे येत असल्याबाबत आढळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारता, त्यांनी त्यांची नांवे भरत तुकाराम कामली वय २१ वर्ष , मनेश तुकाराम ठाकरे वय २० वर्ष , भाऊराव बाबलू चौरे वय २२ वर्ष तिन्ही रा. मालगा, ता. सुबिर, जिल्हा डांग गुजरात असे सांगितले.

त्यांची अंगझडती घेता त्यांचेकडील पिशवीत विविध कंपन्यांचे मोबाईल फोन मिळुन आले आहे. हे मोबाईल कुडाशी गावातील श्री मोबाईल दुकानातुन चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीतांकडुन एकुण ९४ हजार ८१ रु. किंमतीचे विविध कंपनीचे एकुण १० मोबाईल जप्त करण्यात आले असुन तिघांना गुन्हयाचे पुढील कारवाई कामी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here