@the_news_21

काळ व्हीपी सिंगांचा !! आरक्षण ओबीसींचं !!
लागूकरण्या !! टक्के २७ !!

विरोध एकसंघ !! झाला गदारोळ !!
आक्रमक सारे !! संसदेत !!

समर्थन तर दूरच !! पाडलं सरकार !!
स्वप्नपूर्ती झाली !! कुणाची ?

आता कळवळा !! का ओबीसींचा !!
तेंव्हा का होती !! काथेकुट !!

तख्तावर सत्तेच्या !! बसण्यासाठी !!
भुलविले बहुत !! ओबीसी !!

ओबीसींची गत !! केली कठीण !!
झुलविले किती !! नेत्यांनी !!

झाली अशी गत !! आई जेवू देईना !!
मागू देईना भीक !! बाप !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here