@the_news_21
का जरंडेश्वरच घेऊन बसलात ?
४२ विकले गेले येथे !!
नाडले गेले भूमिपुत्र …
वाढले पिता-पुत्र येथे !!१!!
निघाला सहकार इथला
सोने भंगारात शोधले येथे !!
केला युक्तिवाद नेत्यांनी…
कारखाने खोदले येथे !!२!!
सहकारातला असहकार
होता व्यवहार येथे !!
सर्वपक्षीय नेत्यांना…
साजला त्योहार येथे !!३!!
उंच उभ्या चिमणीला
नजर लागली येथे !!
उभारणारी मंडळीही…
शत्रूवत वागली येथे !!४!!
ऊस नाही तिथंही
गाणं गायले येथे !!
विकून कारखाने सारे…
साखरेत न्हालेही येथे !! ५!!