@maharashtracity

काळ गांधींचा होता !! होती आणीबाणी !!
आलं तेंव्हा कुठं !! डोळ्यापाणी ?

काळ तोचि कडवट !! आला या देशात !!
म्हणे कारणीभूत !! रुंगा-बिल्ला ?

झाले हनन इथे !! माध्यम स्वातंत्र्याचेही
जाणीव बहुत !! पारतंत्राची ?

बळ सत्तेचे कठोर !! वापर अमानुष झाला !!
दडपशाही खूप !! माणसापरी ?

झाली नोट बंदी !! रात्री एका तासात !!
तेवढा तरी आला !! काळा पैसा ?

केली भाषणे बहुत !! खाती देऊ १५ लाख !!
पैसा लेकाहो !! स्वप्नात ?

जागविल्या आठवणी !! काळ आणीबाणीचा !!
ठेवून डोळ्याम्होरं !! निवडणूक ?

कसा जागा केला !! काळ १९७५ चा !!
१९१४-१९२१ !! पुसावया ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here