@maharashtracity

जात नाही कोविड !! एन्ट्री डेल्टा प्लस’ची !!
लाटेपायी तिसऱ्या !! पुन्हा निर्बंध !!

खुली सारी दुकाने !! मोठी गर्दी,गजबज !!
होते ग्राहक घाई !! इथं पंचाईत !!

भांडार औषधी म्हणे !! तयार वैद्यक झाले !!
दुसऱ्या लाटे मध्ये !! पैशात न्हाले !!

झाली स्थिती भयंकर !! भयभीत सारे झाले !!
लढण्या दोन हात !! गळे अवसान !!

संशोधनात आपण !! निपुण बहुत !!
होईना खात्री !! लशीचीही !!

आता उरलं सूरलं !! शोधी गिऱ्हाईक !!
विकावया तयार !! म्हणे संसार !!

बळी किती घेणार !! आता हा विषाणू !!
तयार यंत्रणा देण्या !! इथं अग्निडाग !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here