By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: ऐंशीच्या दशकात एक वास्तववादी विषय आणि प्रभावी दिग्दर्शन आणि ३६ दिग्गज कलाकारांच्या भूमिकेने रसिकांची दाद मिळवलेल्या, साडेतीन तपानंतर आजही रसिकांच्या स्मरणात असलेल्या ‘सिंहासन’, चित्रपटाच्या आठवणी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रकट मुलाखत आणि काही भागांचे सादरीकरण यातून आज जागवल्या गेल्या. “सिंहासन” चाहत्यांनी सभागृह फुलून गेले होते.

यावेळी चित्रपट निर्मितीच्या वेळी पुलोद सरकारचे मुख्यमंत्री असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते, खासदार शरद पवार, चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, सिने अभिनेते डॉ.मोहन आगाशे, नाना पाटेकर, यांची प्रकट मुलाखत पत्रकार अंबरिष मिश्र आणि राजीव खांडेकर यांनी घेतली. खासदार सुप्रिया सुळे याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रास्ताविक करताना आज सिंहासन सारखा चित्रपट आला तर थिएटर मिळेल का अशी शंका व्यक्त केली. शरद पवार यांचे हस्ते यावेळी जब्बार पटेल, डॉ. आगाशे, नाना पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here