@maharashtracity
जळगाव: चौथ्या तिमाहीतील (Q4) जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात १९.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
जगातील ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या आणि भारतातील प्रथम क्रमांकाची कंपनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने संचालक मंडळाच्या बैठकीत चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी देऊन जाहीर केले.
ठळक वैशिष्ट्येः
चौथ्या तिमाहीतील जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात १९.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
२०२१ या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पन्न ५६६६.९ कोटी रूपयांवर पोहोचले आणि एकल उत्पन्न २१५६.४ कोटी रूपये नोंदवले.
एकत्रित कर, व्याज व घसारापूर्व नफ्याचा मार्जिन चौथ्या तिमाहीत १ टक्क्यांवरून ११ टक्के इतका वाढला आणि आर्थिक वर्ष २०२१ चा ५ टक्क्यांपासून ८ टक्क्यांपर्यंत वाढला.
FY21 चा एकत्रित करव्याज घसारापूर्व नफा ४६८ कोटी नोंदला गेला आणि एकल करव्याजघसारापूर्व नफा १६५.२ कोटी रूपयांवर पोहेचला.
चौथ्या तिमाहीतील एकत्रित करपश्चात नफा ६३.९ कोटी रूपये झाला आणि एकल करपश्चात तोटा २२.२ कोटी रूपये होता.
आर्थिक वर्ष २०२१ चा एकत्रित करपश्चात तोटा ३६८.७ कोटीवर पोहेचला आणि एकल करपश्चात तोटा ३०७.३२ कोटी रूपये झाला.
जागतिक मागणी पुस्तकात ४१९० कोटी रूपयांच्या ऑर्डर्स आहेत.
या संदर्भात प्रतिक्रिया देतांना अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. म्हणाले, “आम्हाला कंपनीचे चौथ्या तिमाहीचे (Q4) आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात (FY21) आर्थिक निकाल जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे. याआधीच्या तिमाहींपेक्षा चौथ्या तिमाहीत कामकाजाचा स्तर जास्त होता. याचे मुख्य कारण म्हणजे कोविडची लाट सौम्य झालेली होती. चौथ्या तिमाहीत (Q4) एकत्रित उत्पन्नात ९३ टक्के वाढ झाली आणि एकल उत्पन्नात ८ टक्के वाढ नोंदवली. नफ्याच्या बाबतीत दोन्ही एकल आणि एकत्रित आर्थिक निकालात सकारात्मक बदल झालेला आहे. निरंतर प्रयत्नांमुळे आणि व्यवस्थापनाचे लक्ष अंतर्गत आणि बहिर्गत आव्हानांना सामोरे जातांना कंपनीचे काम सुधारण्यावर केंद्रीत केले. त्याचा हा परिणाम आहे.
कंपनीच्या कर्ज निराकरणाच्या बाबतीत सातत्याने प्रगती झाली आहे. ग्रुपमधील कंपन्यांच्या कर्ज निराकरणातही खूप प्रगती झालेली आहे. सध्याच्या योजनांनुसार आम्ही सगळ्या प्रयत्नांच्या यशस्वीतेसाठी आशावादी आहोत. आम्ही सगळ्या भागधारकांचे – सहकारी, बँका, आर्थिक संस्था, भागधारक, पुरवठादार आणि ग्राहक – त्यांच्या आधारासाठी धन्यवाद देतो.”
“कंपनीतून पूर्ण २०२१ आर्थिक वर्षात ५२५ कोटी रूपयांची निर्यात केली. त्यामुळे कंपनीचे उत्पन्नाचे स्त्रोत भक्कम आहे. कंपनीच्या उत्पादनांना भारतात आणि जगात खूप मागणी आहे. कारण कृषीक्षेत्रात चांगली वाढ याही वर्षी होईल. एकल कामकाजातील खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता १० टक्क्यांनी वाढली. तसेच कंपनीचे एकत्रित निव्वळ कर्ज ४१६ कोटी रूपयांनी घटले आहे.”
- अनिल जैन, उपाध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.