@maharashtracity

मुंबई: रक्षाबंधन सणासाठी बेस्ट उपक्रमाने (BEST undertaking) दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जादा बसगाड्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रविवारी २२१ जादा बसगाड्या रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे सणासुदीला ट्रेनमधून प्रवास न करता येणाऱ्या नागरिकांना बेस्टकडून काहीसा दिलासा मिळणार आहे.

रक्षाबंधन (Raksha Bandhan) सण हा भाऊ व बहीण यांच्यासाठी जिव्हाळ्याचा सण आहे. बहीण भावाला राखी बांधून त्याने बहिणीचे रक्षण करावे, ही प्रेमळ अपेक्षा बाळगते. मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव आजही आहे.

कोरोनाची (corona) दुसरी लाट कमी होत आली असली तरी तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच राज्य शासनाने सर्वसामान्य लोकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी देताना काही जाचक नियम घातले आहेत.

त्यामुळे सर्वांना ट्रेनने प्रवास करण्यात अडचण निर्माण होत आहे. मात्र बेस्ट उपक्रमाने रक्षाबंधन सणासाठी रविवारी २२१ जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.

मात्र प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत बेस्ट बसने प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here