@maharashtracity

मुंबई: राज्यात शनिवारी कोरोनाच्या ६,९५९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची (corona patient) एकूण संख्या ६३,०३,७१५ झाली आहे. काल ७,४६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,९०,७८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ७६,७५५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात शनिवारी २२५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७९,६७,६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,०३,७१५ (१३.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७६,६०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home quarantine) आहेत तर ३,१६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ३४५

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३४७७९ एवढी झाली आहे. तर ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आतापर्यंत १५८८९ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here