@maharashtracity

मुंबईत दिवसभरात ४५५ बाधित

मुंबई: राज्यात रविवारी ९,००० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,१४,१९० झाली आहे. रविवारी ५,७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९,८०,३५० कोरोनाबाधित (corona) रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,०३,४८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात काल १८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५४,८१,२५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,१४,१९० (१३.६६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,६७,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (home quarantine)
आहेत तर ४,०६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात ४५५

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ४५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३११५८ एवढी झाली आहे. तर १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५७०२ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here