@maharashtracity

गेवराई, (बीड): कोरोनाचे (corona) नियम पाळून खत (pesticides) व बियाणे (seeds) खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलीसांनी बेदम मारले. बीड (Beed) दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा (BJP) नेते आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज या शेतकरी बांधवाची भेट घेतली. त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली. तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करु असेही आश्वस्त केले.

लाँकडाऊनचे (lockdown) नियम आम्ही पाळतो. सकाळी 11 पर्यंत बी बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस (Police) आम्हाला मारतात. मग ठाकरे सरकारने (Thackeray government) बियाणे आणि खते सरकारने बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, असा टाहो ठाकरे सरकारच्या नावाने शेतकरी फोडतो आहे.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार चार दिवसाच्या बीड आणि नांदेड (Nanded) दौऱ्यावर आहेत. आज बीड येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here