@maharashtracity

मुंबई: सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकींग व्यवसाय त्वरित सुरु करावा. ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना वर्किंग कँपिटल- खेळते भांडवलाकरिता सवलतीच्या व्याज दरात कर्ज द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज बँकांना केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधीसमवेत बैठक घेतली. या बैठकीच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना माहिती दिली. ज्या लोकांना कर्जाचे हप्ते भरायचे आहेत त्यांना काही महिन्यांची सवलत द्यावी, अशा सुचना बँकांना दिल्या असून आपल्यास्तरावरून देखील असे निर्देश देण्यात यावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

प्रक्रिया सुटसुटीत करावी

दरम्यान, आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना म्हणाले की, दावे निकाली काढताना त्यांची नियमावली दाखवून अडचणीत असलेल्या विमाधारक उद्योग व्यावसायिकाना आणखी अडचणीत आणू नये. दावे निकाली काढण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी करावी. पॉलिसी घेतानाचे प्रश्न आता दावे निकाली काढताना विचारू नयेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, रोगराई पसरू नये म्हणून पूरग्रस्त भागाची स्वछता लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे दावे निकाली काढण्यासाठी नुकसान झालेल्या वस्तू आणि वाहने आहे त्या नुकसानग्रस्त स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे महसूल यंत्रणेने पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे सुस्पष्ट छायाचित्रे काढावीत. महसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावीत व त्यावरून नुकसानग्रस्ताना विम्याची रक्कम देण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here