@maharashtracity

धुळे: युवती, विद्यार्थींनींवर होणार्‍या अन्यायाविरुध्द युवासेना (Yuva Sena) युवतींनी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. वेळ पडल्यास युवतींच्या प्रश्‍नांवर प्रत्येकीने तुटून पडावे, अशी अपेक्षा सिनेट सदस्या शीतल देवरुखकर (Senate Member Sheetal Devrukhkar) यांनी व्यक्त केली.

जिल्हा युवासेना युवती पदाधिकारींची कार्यकारीणी जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शीतल देवरुखकर यांनी धुळ्यात येऊन नवनियुक्त सर्व युवतींचा सत्कार करीत त्यांना नियुक्ती पत्र दिले. 

यावेळी महाराष्ट्र सहसचिव, विस्तारक, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे, युवती जिल्हा प्रमुख सोनी सोनार, शहरप्रमुख दक्षता पाटील, नेहा वाघ आदी उपस्थित होते.

या प्रसंगी शीतल देवरूखकर म्हणाल्या की, नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी युवा सेनेची स्थापना झाली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेनेचे जाळे पसरलेले आहे. आजपर्यंत ऐकत आले होते की, ग्रामीण भागात मुली पुढे येणं शकय नाही, परंतु ते सत्य नसल्याचे दाखवण्यासाठी आम्ही युवती सेनेच्या पदाधिकारी नियुक्तीसाठी मुलाखती सुरू केल्या. 

गेल्या चार महिन्यात युवासेना युवती पदाधिकारींची फळी उभी राहिली. जिथे युवती-विद्यार्थीनींवर अन्याय होईल तिथे भिडायचे. युवती-विद्यार्थीनींचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम कटिबध्द असावे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, असा विश्‍वास त्यांनी युवतींना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here