@maharashtracity

धुळे: राज्य सरकारने कोरोना (Corona) संकटाचा फायदा घेत पोलिस बळाने आषाढी एकादशीसाठी (Aashadhi Ekadashi) शेकडो वर्षाची पायी वारीची परंपरा खंडीत केली. तसेच ह.भ.प. बंडातात्या कराड यांना स्थानबध्द केल्याचा निषेध करीत आज विश्‍व हिंदू परिषदेसह (Vishwa Hindu Parishad) वारकरी (Warkari) बांधवांनी भजन आंदोलन केले.

धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे भजन आंदोलन (Bhajan Andolan) करण्यात आले. यावेळी एक निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यात जेष्ठ किर्तनकार हभप बंडातात्या कराड यांना व जागो जागी अडवलेल्या सर्व वारकर्‍यांना सन्मान पुर्वक मुक्त करावे, त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावे, आषाढी वारीला परवानगी द्यावी, मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची माफी मागावी. अन्यथा वारकरी समाज पंढरपुर पॅटर्न राबवत रस्त्यावर उतरेल (protest) असा इशारा दिला.

आंदोलनात विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगिराज मराठे, जिल्हा मंत्री ऍड विशाल पिंपळे, आदी उपस्थित होते. वारकरी संप्रदायाच्या भजन आंदोलनाला धुळे जिल्हा तेली समाजाच्या वतीने पाठींबा देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here