@maharashtracity

धुळे: धुळे तालुक्यातील वाघाडी गटात बिगर आदिवासी उपयोजना अंतर्गत रस्ता बांधण्याचे भूमिपूजन झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे याच्या हस्ते व आमदार कांशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

यावेळी रंधे यांनी माजी मंत्री अमरिश पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या त्यांच्या संकल्पनेतून विकास कामे करू अशी ग्वाही दिली.

“आगामी काळात या वाघाडी गटात कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सोयी अपूर्ण पडणार नाहीत. सर्व जनतेचे विकासाचे काम घरकुल आदिवासी, दलित वस्त्यांमध्ये रस्ते, सामाजिक सभागृह ही कामेही मंजूर करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद स्तरावर करीत आहोत,” असे रंधे म्हणाले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सदस्या सखुबाई पारधी, सरपंच विजय पारधी, उपसरपंच तसवीर जमादार, ग्राम पंचायतीचे सदस्य पंकज वाल्हे, वैशाली कोळी, रामप्रसाद दाभाडे, संगिरा शेख, जयबाई पारधी, रमणबाई पारधी, रेखाबाई पारधी, चैत्राम पारधी, ग्रामसेवक व्ही.एस.कोळी इसाक शेख हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here