Twitter: @maharashtracity

मुंबई: ’श्री अनिरुद्ध आदेश पथक, ’दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, ’अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, अनिरुद्ध समर्पण पथक या संस्थांनी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. अनिरुद्ध जोशी, एमडी मेडिसिन सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या संस्थांनी रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आयोजित केलेल्या या शिबिरात एकूण १५११९ युनिट्स इतके रक्त संकलित करण्यात आले. याचा १०० हून अधिक ब्लड बँकांनी लाभ घेतला. तर मुंबई वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल ८०७१ इतके युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.

दरम्यान, एप्रिल व महिन्यात रक्तपेढ्यांना रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो. त्यामुळे या काळात आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिराचा आपल्याला फार मोठा लाभ झाल्याचे ब्लड बँकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेषतः या वर्षी मुंबईसह महाराष्ट्राच्या रक्तपेढ्यांमध्ये अपेक्षेहूनही फारच कमी युनिट्स शिल्लक रहिले होते. अशा परिस्थितीत महारक्तदान शिबिरामुळे फार मोठा दिलासा मिळल्याचा दावा या ब्लड बँकांकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here