दिवसभरात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात शुक्रवारी ९९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आता राज्यातील कोरोना रुग्णांची ८१,६०,४९९ एवढी संख्या झाली आहे. तसेच काल ११४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ८०,०६,०३२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. 

दरम्यान, राज्यात पाच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६८,६९,०१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,६०,४९९ (०९.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी राज्यात १८,११८ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी १४,८७७ सरकारी प्रयोगशाळेत २९४९ खासगी प्रयोगशाळेत तर २९२ सेल्फ टेस्ट झाल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात एक्सबीबी १.१६ व्हेरिएंटचे ६८१ रुग्ण सापडले असून त्यापैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी १ जानेवारी पासून आजपर्यंत ८० कोरोना रुगणाचा मृत्यू झाला. यापैकी ७२.५ टक्के रुग्ण साठ वर्षावरील, ८१ टक्के सहबाधित तर ११ टक्के रुग्ण सहबाधित नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यात २० एप्रिलपर्यंत ६१२९ रुग्ण सक्रिय असून ५८३४ म्हणजे ९५.२ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २९५ म्हणजे ४.८ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर २३८ साधारण वॉर्डात उपचार घेत असून ५७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. साप्ताहिक अहवालानुसार १५ ते २१ एप्रिल या आठवड्यात सर्वाधिक म्हणजे ५ हजार ९७० रुग्ण आढळून आले.  

९१ रुग्णांची आरटीपीसीआर तसेच जीनॉम चाचणी :

राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता पर्यंत १९,२२,६१६ एवढे प्रवासी आले असून यातील ४३,४०९ प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर ९१ जणांचे नमुने जिनॉमसाठी पाठविण्यात आले.

मुंबईत २२६ नवे रुग्ण :

मुंबईत बुधवारी २२६ रुग्ण आढळले असून आता मुंबईतील रुग्णांची संख्या ११,६०,६१६ एवढी झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून १९७५८ एवढी मृत्यूची संख्या झाली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here