दिवसभरात तिघांचा कोरोनाने मृत्यू
Twitter: @maharashtracity
मुंबई: राज्यात गुरुवारी ७५४ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८१,६४,३८० एवढी झाली आहे. तसेच काल १११० अशा मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ८०,१०,९९५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे झाले आहे.
दरम्यान, राज्यात तिघा कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ८६९५२७०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१६४३८० (०९.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शुक्रवारी राज्यात १५३८२ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी १२५२ सरकारी प्रयोगशाळेत, २६५५ खासगी प्रयोगशाळेत तर २०७ सेल्फ टेस्ट झाल्या असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात ए एक्स बी १.१६ व्हेरिएंटचे ८७७ रुग्ण सापडले असून त्यापैकी ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी १ जानेवारी पासून आजपर्यंत ९३ कोरोना रुग्णाचे मृत्यू झाला. यापैकी ७३.१२ टक्के रुग्ण साठ वर्षावरील, ८७ टक्के सहबाधित तर १३ टक्के रुग्ण सहबाधित नसल्याचे सांगण्यात आले.
राज्यात २६ एप्रिलपर्यंत ५२३३ रुग्ण सक्रिय असून ५००४ म्हणजे ९५.६ टक्के रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २४९ म्हणजे ४.४ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर १८३ रुग्ण साधारण वॉर्डात उपचार घेत असून ४६ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. साप्ताहिक अहवालानुसार २१ ते २७ एप्रिल या आठवड्यात ४ हजार ८७४ रुग्ण आढळून आले.
१०१ रुग्णांची आरटीपीसीआर तसेच जीनॉम चाचणी :
राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २०,१७,३९४ एवढे प्रवासी आले असून यातील ४५,३२१ प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर १०१ जणांचे नमुने जिनॉमसाठी पाठविण्यात आले.
मुंबईत १३५ नवे रुग्ण :
मुंबईत गुरुवारी १३५ रुग्ण आढळले असून आता मुंबईतील रुग्णांची संख्या ११,६१,५३४ एवढी झाली आहे. तर दिवसभरात एकाचा मृत्यू झाला असून १९,७६३ एवढी मृत्यूची संख्या झाली आहे.