By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: राजावाडी हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त व कॅशलेस रुग्णालय करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मेघदूत निवासस्थान येथे घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज व राजावाडी हॉस्पिटल संदर्भात बैठक झाली. यावेळी आमदार राम कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, घाटकोपर येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स सुरू करण्यासंदर्भात मागणी असून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान, रायफल रेंजसाठी पर्यायी जागेची पाहणी पोलिस विभागाने करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

घाटकोपर पश्चिम येथील रायफल रेंज परिसरात स्पोर्ट्स काॅम्प्लेक्स, थीम फाॅरेस्ट, कृत्रिम तलाव तसेच हा परिसर रमणीय करण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्प तयार करता येईल. यासाठी रायफल रेंज पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.

राजावाडी हाॅस्पिटल नव्याने बांधण्याची आवश्यकता असल्याची सूचनाही आमदार राम कदम यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here