@maharashtracity
बदलापूर: मुंबईपासून (Mumbai) साधारण ६४ किमी अंतरावर असलेल्या बदलापूर (Badlapur) शहरातील डॉ. रुपाली अंगारख -मोहिते (Dr Rupali Mohite) या स्वतः सहा महिन्यांच्या गर्भवती (Pregnant) असूनही कोरोना (Corona) रुग्णांवर न थकता आणि विश्रांती न घेता उपचार करत आहेत. बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) डॉ रुपाली यांच्या कार्याला समाल केला असून त्यांचा सत्कार केला आहे.
डॉ रुपाली या शहरातील गौरी हॉल कोविड सेंटरमध्ये (Gauri Hall Covid Centre) कार्यरत आहेत. डॉ.रुपाली या सहा महिन्यांच्या गर्भवती असूनही कोरोना बाधितांवर उपचार करत आहेत. रुग्णसेवा हे कर्तव्य मानून त्या न डगमगता, जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा सत्कार केला आहे.
सौ.प्रियांका आशिष दामले (Priyanka Ashish Damle) यांनी यावेळी डॉ रूपाली यांना पन्नास हजार रुपयांचा मदतनिधी तसेच पुस्तके भेट दिली.
डॉ.रुपाली अंगारख-मोहिते यांच्या कर्तव्यनिष्ठेला आमचा बदलापूरकरांचा सलाम.! डॉ.रुपाली यांचे हे योगदान बदलापूरकर नेहमीच कृतज्ञतेने लक्षात ठेवतील