By Santosh Masole

Twitter: @MasoleSantosh

धुळे: भरधाव मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने चिवटी बारी (ता.साक्री) घाटात कठड्याला धडकून मोटरसायकल स्वार थेट दरीत कोसळून जागीच ठार झाला.

सोमीराज किसन पवार रा. मोहळांगी पो. गोडवळ ता. सटाणा जि. नाशिक असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमीराज पवार हे त्यांच्या कडील एमएच ४१-डब्ल्यू ६८७५ हिच्यावर मोहळांगी येथून बिहुलपाडा ता. सुबीर जि. डांग, गुजरात येथे सासुरवाडीला जात असतांना कुडाशी ते आलियाबाद रस्त्यावरील चिवटी बारी ता. साक्री घाटात ते वेगावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. त्यामुळे मोटरसायकलवरील ताबा सुटून ती घाटातील कठड्यावर धडकली आणि मोटरसायकलसह ते खोल दरीत कोसळले.

दिनांक २५ जून रोजी दुपारी पावणे तीन वाजेला हा भीषण अपघात घडला, अशी माहिती किसन लक्ष्मण पवार रा. रा. मोहळांगी पो. गोडवळ ता. सटाणा जि. नाशिक यांनी पोलिसांना दिली. या माहितीवरुन पिंपळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here