आमदार प्रा मनीषा कायंदे यांच्या स्विय सहायकांची थेट मागणी

आरोपानंतर पी ए ची तातडीने कामावरून हकालपट्टी

Twitter: @vivekbhavsar

मुंबई: भारतीय जनता पक्षातून उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेत येऊन विधान परिषद सदस्य आणि प्रवक्ते झालेल्या प्रा मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यापासून त्या ठाकरे गटाच्या रडारवर आल्या आहेत. प्रा मनीषा कायंदे या विकास निधी देण्यासाठी टक्केवारी मागतात असे दर्शविणारी एक ऑडियो क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली असून त्यात प्रा कायंदे यांचे खाजगी सिय सहायक राजेंद्र केळसकर हे १० टक्के कमिशनची मागणी करत असल्याचे ऐकायला येत आहे.

गोंदिया येथील मोरगडे आडनाव असलेल्या व्यक्तीला प्रा मनीषा कायंदे फोन करून सांगतात मी काल माझ्या पी ए ने तुम्हाला फोन केला होता, राजेंद्र केळसकर यांनी, तुम्ही तो फोन घेतला नाही, तुम्ही त्यांना फोन करा, अशा सूचना प्रा कायंदे देत असल्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.

याच ऑडियो क्लिप मध्ये पुढे ही व्यक्ती पी ए केळसकर यांना फोन करून स्वतःची ओळख देते आहे. ती व्यक्ती कार्यक्रमात असल्याने फोन उचलू शकली नाही असे सांगते आणि १८ तारखेला मुंबईला येऊन पत्र घेते असे सांगते.

Also Read: मनीषा कायंदे यांचे सदस्य रद्द करा

स्वीय सहायक कार्यालयात या असे सांगतात आणि पैशाचे काय? पैसे कोण देणार असा प्रश्न विचारते. समोरची व्यक्ती सांगते की जिल्हा नियोजनचे काम आहे ना? त्यावर पी ए सांगतात की नियोजनचेच काम आहे पण आम्हाला १० टक्के प्रीमियम द्यावा लागेल. ती व्यक्ती सांगते की हे समाजाचे काम आहे, त्यावर पी ए सगंत आहेत की सगळीच कामे समजाची असतात, पण आम्हाला तर १० टक्के द्यावेच लागेल.

दरम्यान, या गंभीर आरोपावर प्रा कायंदे यांनी सविस्तर खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख निलेश धुमाळ यांनी मला या मोरागडे व्यक्तीला समाज मंदिरासाठी निधी देण्याची विनंती केली होती. मोरगडे सारखे मला फोन करत होते म्हणून मी त्यांना फोन करून सांगितले की निधीचे काम बघणारे माझे पी ए आहेत, त्यांना संपर्क करा, मला करू नका. पुढे काय झाले ते संभाषणातून समजते आहे. त्या व्यक्तीने (केळसकर) यांनी असे करायला नको होते, ही गंभीर बाब आहे आणि म्हणून मी त्यांना लगेच कामावरून काढून टाकले आहे. यात माझी काहीही चूक नाही, असा खुलासा प्रा मनीषा कायंदे यांनी केला आहे.

दरम्यान, ही ऑडियो क्लिप समजमध्यामात आल्यावर प्रा कायंदे अडचणीत आल्या. शिंदे गटात गेल्यापासून प्रा कायंदे या उद्धव सेनेच्या रडारवर आल्या असून त्यांच्या चुका शोधण्याची जबाबदारी काही नेत्यांकडे सोपविण्यात आल्याचे समजते. या अशी उद्धव सेनेच्या सुषमा अंधारे यांनी प्रा कायंदे यांनीच त्यांना दिलेले एक जुने पत्र ट्विट करून प्रा कायंदे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती.

प्रा कायंदे यांनी बाळासाहेब भवनात घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमकपणे टीका केली होती. मुंबई महापालिकेतील ठेवींवर शिंदे – फडणवीस सरकारची नजर असल्याची टीका उद्धव ठाकरे नाव आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यावर प्रा कायंदे यांनी कठोर शब्दात ठाकरे आणि शिवसेनेचा समाचार घेतला होता. त्यामुळे यापुढे उद्धव सेनेकडून प्रा कायंदे यांची जुने प्रकरणे बाहेर काढली जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here