महापालिका व सेंट अँथनी स्कूलचा उपक्रम

@maharashtracity

धुळे: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर (corona pandemic) महापालिका व सेंट अँथनी स्कूलतर्फे शाळेच्या प्रांगणात ४६ अंध बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला.

महापालिकेला (DMC) काही सामाजिक संस्थांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती. त्याचबरोबर अंध बांधवांना मदत करण्यासाठी मनपा महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात यांनीही आयुक्तांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने काही सामाजिक संस्थांच्या मदतीने अंध बांधवांसाठी किराणा साहित्याचे वाटप केले.

शहरातील सेंट अँथनी स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी गव्हाचे पीठ, तिखट, साखर, तेल, तूरडाळ, तिखट, मीठ, साबण आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात, आयुक्त अजिज शेख, फादर विल्सन रॉड्रिक्स, कर्नल उत्तमराव पाटील, फादर संदीप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here