By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाली आहे. महामंडळ अध्यक्षा डॉ. उषा तांबे यांनी पूणे येथे आगामी अमळनेर संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून शोभणे यांची निवड जाहीर केली.

पूणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत विविध घटक संस्थांकडून अमळनेर साहित्य संमेलन अध्यक्षपदाकरिता आलेल्या नावांवर विचार करण्यात आला. त्यात डॉ.रविंद्र शोभणे यांची निवड झाली.

अ.भा.मराठी साहित्य महामंडळाने स्विकारलेल्या नव्या निवड प्रक्रियेनुसार संमेलन अध्यक्षपदाकरिता निवडणूक न घेता सहमतीने ज्येष्ठ साहित्यिकांची निवड करण्याची पद्धत अंगिकारण्यात येते. संमेलन अध्यक्ष पदासाठी निवडणूक न लढविण्यावर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा भर असतो. त्यामुळे संमेलन अध्यक्ष निवडल्यानंतर वाद व चर्चा वर्षानुवर्षे होत आल्या आहेत. त्यामुळे निवड पद्धत अंगिकारण्याची मागणी अनेक वर्षे होत होती. त्यानुसार डॉ.रविंद्र शोभणे यांची निवड झाली.

डॉ. शोभणे यांच्या संमेलन अध्यक्षपदी निवडीमुळे साहित्य प्रांतात चार दशके लेखन करणाऱ्या कथाकारांचा सन्मान झाला, अशी भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here