@maharashtracity

भाजपचे खा.डॉ.सुभाष भामरेंनी केली उपाययोजनांची मागणी

धुळे: जिल्ह्यात शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट येऊनही पाऊस न पडल्याने दुष्काळ सदृष्य (drought like situation) परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बहुतांश शेतकरी (farmers) अडचणीत सापडले आहे. परिणामी, प्रशासनाने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करुन शेतकर्‍यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी भाजपचे खा. डॉ. सुभाष भामरेंनी (BJP MP Dr Subhash Bhamare) केली आहे.

या संदर्भात खा. डॉ.भामरेंनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच दुष्काळ सदृष्य परिस्थितीचा आढावा घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

खा.डॉ.भामरेंनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खरीपाची लावणी व पेरणी केली. परंतु जून महिन्यापासून तर आजपर्यंत समाधानकारक पाऊस नसल्याने बहुतांश शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.

मुळात अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांनी आपल्याकडे होता तो सर्व खर्च केलेला आहे. परंतु गेल्या आठवड्यापासून हवामानाचा अंदाज जाहीर होऊन सुद्धा शेतकरी बांधवांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असून जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे. यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शासन व प्रशासनाच्या पातळीवर प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अंत्यत गरजेचे आहे.

याकरीता राष्ट्रीयकृत बँकांनी (Nationalised banks) शेतकर्‍यांना तातडीने पिक कर्ज (crop loan) उपलब्ध करून द्यावे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या कृषीपंपाना (Agriculture pumps) वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा व बिघाड झालेले ट्रान्सफार्मर (transformer) तातडीने दुरुस्त करण्यात यावे, जनावरांच्या साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना योग्य कार्यवाहीच्या सूचना कराव्यात. शेतकर्‍यांच्या पशुधनासाठी चार्‍याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात करुन द्यावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here