@maharashtracity

सामाजिक बांधिलकी राखत जिल्हा सहकारी बँका घेणार पुढाकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई: राज्यातील पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) व सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, (flood affected small traders), व्यावसायिक टपरीधारकांना पुन्हा सक्षमपणे उभे राहण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या बधितांना अत्यल्प दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँका (DCC Banks) पुढे आल्या आहेत.

राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला आहे. ना-नफा तत्वावर अवघे ५ ते ६ टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार (Dy CM Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बाधितांना मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा सहकारी बँकांनी भांडवल उभारणी खर्चापेक्षा (Cost of Fund) थोड्या अधिक व्याज दराने बाधित दुकानदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुर आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि पंचनामा झालेल्या पात्र दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना साधारपणे अवघ्या ५ ते ६ टक्के व्याजाच्या दराने कर्ज उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here