ठराव रद्द करण्याची मुस्लिम नगरसेवकांची मागणी

@maharashtracity

धुळे: महापालिकेची (municipal corporation) शाळा क्र. २० ही सिल्लोड येथील संस्थेला भाडेतत्वार देण्याचा खोटा आणि बेकायदेशीर ठराव रद्द करावा, अशी मागणी मुस्लीम नगरसेवकांनी केली आहे. हा ठराव रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त अजीज शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २९ जून २०२१ रोजी महापालिकेच्या झालेल्या महासभेत विषय पत्रिकेतील विषय क्र.१५३ वर विचार विनिमय करण्यात आला आणि महापालिकेची शाळा क्र. २९ ही शाळा नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड जि. औरंगाबाद या संस्थेला देण्यात येवू नये असे ठरविले.

मात्र विषय पत्रिकेत महापालिका शाळा क्र. २० चा उल्लेेख नसताना ठराव क्र.१९० नुसार संस्थेस महापालिकेची उर्दू शाळा (Urdu School) क्र. २० नाममात्र आकारणी करुन भाडेतत्वावर देण्यास मान्यता दिल्याचा खोटा व बेकायदेशिर ठराव कोणत्याही नगरसेवकाला विश्‍वासात न घेता व अंधारात ठेवून मंजुर करण्यात आला आहे.

वास्तविक पाहता १९२३ ला शाळेची स्थापना झाली. महापालिकेची पहिली डीजीटल शाळा म्हणून या शाळेची निवड झाली. आदर्शव्रत शाळा असताना आणि या शाळेत गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत असताना असा बेकायदेशीर ठराव पारीत झालाच कसा, असा सवालही नगरसेवकांनी विचारला आहे.

यामुळे हा बोगस ठराव रद्द करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक साबीर शेख, उमेर अन्सारी, वसीम बारी, अमीन पटेल, सरफराज अन्सारी कलीम शेख, गणी डॉलर, वसीम मंत्री या नगरसेवकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here