@maharashtracity

धुळे: तृतीयपंथींना (transgender) स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी तृतीयपंथी समस्या निवारण समितीने महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली आहे. याबाबत आयुक्तांनीही तातडीने सूचना करीत ही जमीन उपलब्ध करुन देण्याची ग्वाही तृतीयपंथींना दिली.

धुळे जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तृतीयपंथी समस्या निवारण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून नोंदणीकृत तृतीयपंथीसाठी दफनविधीसाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल योजना, संजय निराधार योजनेतून लाभार्थींना लाभ देणे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड उपलब्ध करणे असे विविध प्रश्‍न तसेच त्यांना येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

शिवाय, या समितीची १४१ जून २०१९ रोजी तृतीयपंथी समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. त्यात प्रामुख्याने तृतीयपंथींना स्मशान भूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी, म्हणून ठराव करून मनपाकडे प्रस्ताव देण्यात आला. यानंतर समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांच्या उपस्थितीत समाजकल्याण कार्यालय या ठिकाणी बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली.

प्रामुख्याने तृतीयपंथीसाठी स्मशानभूमी उपलब्ध व्हावी यासाठी समितीने पाठपुरावा करावा, असे या बैठकीत ठरले.

त्यानसार तृतीयपंथीयांसह समितीच्या सदस्यांनी बुधवारी मनपा आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन, तृतीयपंथींना धुळे शहरात एक ते दोन एकर जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी तृतीयपंथी समितीचे सदस्य तथा तृतीयपंथी गुरु पार्वती जोगी, अ‍ॅड.विनोद बोरसे, सचिन शेवतकर, निलू जोगी, रोहिणी जगदेव, मीनाताई भोसले, मंदाकिनी गायकवाड, सचिव कविता अहिरे, शांताराम अहिरे आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here