नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबविणार

पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यात येईल. या योजनेतून प्रति वर्ष रक्कम ६ हजार रुपये लाभ म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये अशी वार्षिक समान तीन हप्त्यात पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात येतील. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै २ हजार रुपये, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर २ हजार रुपये, तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च २ हजार रुपये, असे वितरित करण्यात येणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभा‍र्थींना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली. संनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील गठीत करण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here