Twitter : @maharashtracity

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाची दखल घेऊन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी विशेष गौरव केला. तळेरे येथील अक्षरघराला भेट देऊन हा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी या कामाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. असंख्य शिक्षणाच्या प्रवाहात नसलेल्या मुलांना शैक्षणिक मदत करुन त्यांना शिक्षण देत आहेत. स्वत:ची पदरमोड करुन ते हे कार्य गेली अनेक वर्षे सुरु ठेवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक मुलांनाही शिक्षण प्रवाहात त्यांनी आणले आहे. तर जिल्ह्यातील निकेत पावसकर यांच्या संदेश पत्र सन्ग्रहाबाबत जाणून होते. मात्र, प्रत्यक्ष हे काम नेमके चालते कसे? यामागे उद्देश काय आहे? आणि याचा फायदा शालेय मुलांना कसा होऊ शकेल? हे जाणून घेण्यासाठी प्रवीण काकडे यांनी निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला भेट दिली.

या भेटीदरम्यान या संग्रहाची कल्पना कशी सुचली? आणि याचा मुलांना कसा फायदा होऊ शकतो? याबाबत माहिती घेतली. दरम्यान अनेक पत्रे आणि संदेश आवडले. तसेच, हा उपक्रम नवीन पिढीला दिशादर्शक होईल, असे यावेळी काकडे म्हणाले. यावेळी प्रवीण काकडे यांच्या हस्ते निकेत पावसकर यांना शाल व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व महाराजा यशवंत होळकर यांची सुंदर प्रतिमा देऊन गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार दत्तात्रय मारकड, सौ. सुनयना पावसकर आदी उपस्थित होते.

तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिध्द गुढ कथालेखक चंद्रशेखर हडप व पुणे येथील प्रसिध्द छायाचित्रकार विजुभाई देसाई यांनी या अक्षरघराला भेट दिली. त्यावेळी विजुभाई म्हणाले की, विलक्षण अक्षरांच्या महासागराच्या किनाऱ्यावर आपण आम्हाला आणलेत, आपल्या या दैदीप्यमान कार्याचे वर्णन शब्दात करणे केवळ अशक्य आहे. त्यामागची जिद्द, तळमळ, सातत्य याचे कौतुक आहे. त्यासोबतच हा सर्व ठेवा योग्य रितीने जतन करुन अतिशय आकर्षक मांडणी करणे हे कौशल्याचे काम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here