राष्ट्रवादीचे खासदार तटकरे गडकरींच्या भेटीला

@maharashtracity

रायगड: कोकणच्या (Konkan) विकासाची गाडी फास्ट ट्रक वर आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai – Goa National Highway) गेले कित्येक वर्षे अपूर्णावस्थेत आहे. या महामार्गाचे काम मार्गी लागावे यासाठी रायगडचे (Raigad) खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (NCP MP Sunil Tatkare) यांनी दिल्लीत राष्ट्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली.

तटकरे यांनी कोकणातील महामार्गासह महत्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत गडकरी यांच्यासोबत विस्तर चर्चा केली.

रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, पोलादूर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भूसंपादनाच्या समस्येमुळे मुंबई-गोवा एनएच-६६ च्या चौपदरीकरणाच्या कामावर परिणाम होत आहे. डिसेंबर २०२० पासून निधी वितरण प्रक्रिया थांबली असून यामुळे कामाच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे. ही बाब तटकरे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here