Twitter : @maharashtracity

मुंबई: जॉन्सन अँड जॉन्सन या बेबी पावडर तयार करणाऱ्या प्रसिद्ध कंपनीने पावडर निर्माण करण्याचा परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे जमा केला आहे. ही कंपनी निकृष्ट दर्जाची बेबी पावडरचे उत्पादन करत असल्याने एफडीएकडून कारवाई करण्यात आली होती. या पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत असलेले घटक आढळल्याने एफडीएने कारवाई केली होती.

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने बेबी पावडर तयार करण्याचा परवाना सरेंडर केला असल्याचे वृत्ताला एफडीएच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. कर्करोगास कारणीभूत घटक आढळल्यानंतर एफडीएने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घातली. हे प्रकरण उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले होते. मात्र एफडीएने ही कायदेशीर लढाई जिंकली. त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला परवाना एफडीएकडे सुपूर्द करण्यावाचून काही पर्याय उरला नव्हता. एफडीएच्या सतर्कतेमुळे जॉन्सन बेबी पावडरच्या निकृष्ट दर्जाच्या उत्पादनाची बॅच लोकांपर्यंत पोहोचल्यावर कॉस्मेटिक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. अखेर कंपनीने उत्पादनाचा परवाना सरेंडर केला. १७ सप्टेंबर २०२२ रोजी, एपडीएच्या तपासणीत असे दिसून आले की जॉन्सन बेबी पावडरचा वापर लहान मुलांच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो. कंपनीला कॉस्मेटिक कायद्यान्वये नोटीस बजावून उत्पादन आणि पुरवठा आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here