जीआर काढूनही अंमलबजावणी अभावी भूर्दंड एमडी – एमएस वैद्यकीय विद्यार्थ्यांना

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यातील रुग्णालयांमध्ये बंधपत्रित सेवा डॉक्टरांची संख्या १६०० होती. मात्र ती कमी पडत असल्याने डॉक्टरांकडून पदसंख्या वाढविण्याच्या मागणीचा विचार करुन सरकारने ती पदे १४३२ एवढी करुन घेतली. त्याबाबतचा रितसर शासकीय आदेशही जारी करण्यात आला. मात्र नेहमीप्रमाणे सरकार त्या जीआरवर अंमलबजावणी करण्यास विसरले. यामुळे एमडी, एमएस सारख्या डॉक्टरांना तीन महिने बेरोजगारी सहन करावी लागणार आहे. बीएमसी मार्ड या पालिकेच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर संघटनेने थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून जीआर काढलेल्या १४३२ पदांची त्वरीत भरती करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन अतिरिक्त जागा १४३२ तसेच पूर्वीच्या १६०० जागा अशा मिळून ३०३२ जागांवर उमेदवार त्वरीत काम करु शकतील.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने बंधपत्रित सेवेसाठी पात्र उमेदवाराची आणि जागेची यादी त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केली. त्यामध्ये असे दिसून येते की बऱ्याच विभागामध्ये जागेच्या तुलनेत पात्र उमेदवार हे जास्त असल्याची बाब विद्यार्थ्यांच्या ध्यानात आले. त्याचवेळी सरकारने समंती दिलेल्या नवीन १४३२ जागा या यादीत समाविष्ट केल्या नसल्याने सर्वाधिक डॉक्टरांना बेरोजगारी सहन करावी लागणार असल्याची तक्रार बीएमसी मार्डकडून मांडण्यात आली. यावर बोलताना बीएमसी मार्डचे सदस्य डॉ. प्रविण ढगे यांनी सांगितले की, बंध पत्रित सेवांमधील डॉक्टरांच्या जागा वाढवून देण्यासाठी यापूर्वीच आंदोलन केले. एमडी आणि एमएस पास झाल्यानंतर एक वर्षाची बाँड सेवा डिएमईआर देत असते. यंदा एमडी आणि एमएस विषयातीले एक हजार सातशेहून अधिक विद्यार्थी पास झाली आहेत. मात्र रिक्त उमेदवाराच्या यादीत एक हजार सहाशे जागा दाखवल्या आहेत. यात दिडशे जागांचा फरक आहे. त्याचवेळी मुक्त होणाऱ्या जागांवर अद्यापही डॉक्टर बंधपत्रित सेवा बाजावत असून हे लोक ३१ ऑक्टोबर रोजी यांची बंधपत्रित सेवा मुक्त होणार. शिवाय बंधपत्रित सेवा पदे आणि एमडी एमएस उत्तीण विद्यार्थ्यांची संख्या यात तफावत असल्याने जानेवारी महिन्यात एक हजार चारशे जागा वाढवून घेण्यात आल्या होत्या. जागा वाढवून देण्याचा शासकीय निर्णय सहा जानेवारी रोजी काढण्यात आला असला तरी देखील जागा घेण्यात आल्या नाहीत अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत.


“जीआर काढून त्यांवर अंमलबजावणी न झाल्याने हा गोंधळ झाला असल्याचे हे विद्यार्थी डॉक्टर तक्रार करत आहेत. यात अडीच ते तीन हजार जागा राज्यात दाखवण्याची गरज होती. मात्र तसे केल्याने या डॉक्टरांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्याचा कालावधीत डॉक्टर बेरोजगार राहणार आहेत.”

  • डॉ. प्रविण ढगे, सदस्य, ऍडव्हायजरी लिगल कमिटी, बीएमसी मार्ड.

रिक्त जागा आणि उत्तीर्ण उमेदवार संख्या

विषय उपलब्ध सीट्स उत्तीर्ण उमेदवार
पीएसएम ४० ९८
फार्मा ३३ ४७
अनाइस्थेशिया १६७ २१०
पॅथॉलॉजि ७० ११४
मायक्रोबियॉलॉजी ३६ ५६
रेडिशन ओंकॉलॉजी ०१ ०३
ओबीजी १४० १९४
ओपथॉल ५३ ८२
इएनटी ५२ ५९
जनरल सर्जेरी ८७ १८५
गेरीॅट्रिक मेडिसिन २ ३
प्लमनरी मेडिसिन ३५ ३६
जनरल मेडिसिन १८६ १९२
पीडियाट्रिक ११४ १३२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here