राज्य आरोग्य विभागाच्या चाचणी अहवालातून स्पष्ट

मुंबई: आरोग्य विभागाने कोविड चाचण्याचा अहवाल सोमवारी प्रसारीत केला असून अहवालात सध्या राज्यात एक्सबीबी१.१६ या व्हेरिएंटचे ६८१ रुग्ण सापडले असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, एक्सबीबी१.१६ हा व्हेरिएंट आव्हानात्मक ठरत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, सोमवारी राज्यात ९६१६ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ७२७६ सरकारी प्रयोगशाळेत तर २१८५ खासगी प्रयोगशाळेत आणि १५५ सेल्फ टेस्ट करण्यात आल्या. यात व्हेरिएंटचे अहवाल समोर येत आहेत. २१ मार्च ते १७ एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने रुग्ण झाल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे. यात २१ ते २४ मार्च या आठवड्यात २१९४ रुग्ण आढळले. तर २८ मार्च ३ एप्रिल ३५३१ रुग्ण आढळले. तसेच ४ ते १० एप्रिल ४६६७ रुग्ण आढळले. शिवाय ११ ते १७ एप्रिल या दरम्यान सर्वाधिक म्हणजे ६०८७ रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले.  

यावर्षी ६२ रुग्णांचा मृत्यू

दिनांक १ जानेवारी २०२३ पासून आजपर्यंत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ७२.५८ टक्के रुग्ण साठ वर्षावरील आहेत. तर ५८ टक्के रुग्ण सहबाधित नसलेले होते. तसेच ३२ टक्के रुग्णांची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही असे सांगण्यात आले. तर १६ एप्रिलपर्यंत ५९१६ सक्रिय रुग्ण असून यात ९४ टक्के म्हणजे ५६०० रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवले हेते. तर ५.३ टक्के म्हणजे ३१६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. यातील ४.७ टक्के म्हणजे २८० रुग्ण साधारण वॉर्डात आहेत. तर ०.६ टक्के म्हणजे ३६ रुग्ण आयसीयू मध्ये दाखल होते असलयाचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here