७१ जणांवर उपचार सुरु
Twitter: @maharashtracity
मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघाताने मृत्यू झालेल्यांची संख्या आता १३ वर पोहचली आहे. दरम्यान, यातील ११ मृत्यू हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच झाले असल्याचे एमजीएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आता या मृत्यूवर टिका सुरु झाल्याने अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहिर पत्र लिहून वेदना प्रकट केली आहे.
खारघर एमजीएम रुग्णालयाचे डॉ. के. सलगोत्रा यांनी सांगितले की, खारघर येथील सेंट्रल पार्क मध्ये उष्माघाताने प्रभावित झालेले रुग्ण रुगणालयात आणण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला येथे १७ लोकांना दाखल करण्यात आले. या १७ मधील चार रुग्णांव्यतिरिक्त लहान मोठ्या दुखापती झाल्या होत्या. मात्र ज्यांना उष्माघाताचा त्रास झाला असे लोक हृदयरोगी, मधुमेही किंवा रक्तदाबाचे रुग्ण असल्याचे आढळून आले. अशांना जास्त त्रास झालेला दिसून आला. यातील दोघांना व्हेंटीलेटर ठेवण्यात आले. तर बाकीच्यांना सामान्य वॉर्ड मध्ये उपचार सुरु होते. यातील एका महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित जणांवर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. खारघर येथील दोन रुगणालयांमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.