राज्यात ५०५ नवे रुग्ण

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्यात सोमवारी ५०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले. तर रविवारी हीच संख्या ६५० एवढी नोंद झाली होती. शनिवारपासून राज्यात दैनंदिन कोरोना नोंद घटत असल्याचे समोर येत आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१,५६,३४४ एवढी झाली आहे. काल ३३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत ८०,०१,७७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के एवढे झाले आहे. 

राज्यात सोमवारी एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूंची नोंद झाली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६८,०१,६२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,५६,३४४ (०९.४० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६०८७ सक्रिय रुग्ण आहेत.

तसेच २४ डिसेंबर २०२२ पासून पुन्हा सुरु करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांच्या सर्वेक्षणनुसार आजपर्यंत १८,६७,२१९ एवढे प्रवासी आले. यातील ४१,९५९ प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी ७७ नमुने पाठविण्यात आले.  

मुंबईत १३१ बाधित 

मुंबईत आज दिवसभरात १३१ कोरोना रुग्ण आढळले असून ११,५९,७५९ एवढे रुग्ण झाले आहेत. तर आतापर्यंत १९,७५४ मृत्यू झाले असल्याचे सांगण्यात आले. तर मुंबईत १,६९९ रुग्ण संक्रिय असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here