जिव्हाळा सामाजिक संस्थेने राबविला उपक्रम

@maharashtracity

धुळे: येथील मालेगाव रोडवरील बर्फ कारखान्याच्या मागील परिसरातील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी (काळूबाई) मंदिरात जिव्हाळा सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वतीनंद उर्फ पार्वती परशूराम जोगी यांच्या आदेशाने त्यांच्या शिष्या अलका (संदल) पार्वती जोगी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तृतीयपंथीयांच्या समस्या तक्रार निवारण समिती आमंत्रित सदस्य तथा जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अॅड.विनोद बोरसे यांनी जिजामाता यांचा कार्यालेख सांगितला.

यावेळी जानवी अलका जोगी, रेणुका निलु जोगी, विशाखा अलका जोगी, दिपाली पवन जोगी, साक्षी पार्वती जोगी, मनिषा जानवी जोगी आदी तृतीयपंथी उपस्थित होते. जिव्हाळा सामाजिक संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाने तृतीयपंथी भारावून गेले.जनसामान्यातून जिव्हाळा संस्थेच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले जात आहे.

तृतीयपंथीयांना देखील सन्मान मिळायला हवा !

समाजातील एक दुर्लक्षित घटक म्हणुन तृतीयपंथीयांकडे बघितलं जातं. वास्तविक ते देखील समाजातील अविभाज्य घटक आहेत. तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. तेव्हा अशा छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना सन्मान द्यायलाच हवा !

  • अॅड.विनोद बोरसे
    आमंत्रित सदस्य, तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण जिल्हा समिती, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here