@maharashtracity

धुळे: शहरापासून जवळ असलेले लळिंग वनक्षेत्र (Laling Forest) हे जंगल पर्यटनसाठी विलोभनीय ठिकाण आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पर्यटन विभागाच्या माध्यमातून जंगल ट्रॅकिंगची सुरुवात ३० जुलैला धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली.

यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा धुळे जिल्हाप्रमुख ऍड पंकज गोरे यांनी विशेष पाठपुरावा करीत मंजुरी मिळवली.

लळींग वनक्षेत्रात १६०० एकर आसपासच्या जमिनीवर जंगल फेरी पार्क उभारण्याचा मानस ऍड. पंकज गोरे यांचा असून याबाबत स्वतंत्र प्रस्ताव देखील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर मांडणार आहे. सुरवातीला या भागातील पर्यटन वाढीसाठी जगलं फेरी ट्रॅकिंग आजपासून सूरु करण्यात आली असून धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते उदघाटन झाले.

याप्रसंगी उपस्थित युवासेना महाराष्ट्र सहसचिव तथा धुळे जिल्हाप्रमुख ऍड. पंकज गोरे, कन्झरव्हेटर ऑफ फॉरेस्टचे डी. डब्ल्यू. पवार, उपवन संरक्षक अधिकारी माणिक भोसले, सर्व वन विभाग अधिकारी, वनसंरक्षक होते.

आज सुरु केलेल्या जंगल ट्रेकिंगसाठी किल्ले लळींगपासून जवळच एक प्रवेश कमान उभारण्यात आली आहे. याच जंगल फेरी कमानी पासून ते सरवार मारुती मंदिर पर्यंत ५ किलोमीटर, मारुती मंदिर ते लांडोर बंगला ५ किलोमीटर असा रस्ता उपलब्ध असून त्यावरून नागरीकांना पायी फिरून अथवा सायकल ट्रेकिंगचा आनंद घेता येणार आहे.

सध्याच्या कोरोना प्रतिबंधामुळे सर्व शासन निर्णय पाळून ट्रेकिंग सुरू राहणार आहे. ट्रेकिंग दरम्यान धुळेकर बांधवांनी वृक्ष लावणे, पाणी टाकणे, वृक्ष दत्तक घेणे, धुळेकर बांधवांकडून शक्य होईल ते योगदान करावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.

ट्रेकिंग दरम्यान दारू, सिगरेट, माचीस, लाईटर, कशालाही परवानगी राहणार नाही. हे जंगल फेरी पार्क प्रत्येक बांधवांचे आहे यामुळे जंगल फेरी पार्कची काळजी घेण्याची जबाबदारी ही प्रत्येक पर्यटकांची असेल. पाहणीत रस्ते, वनसंवर्धन आदी बाबत चर्चा करण्यात आली.

लळींग जंगलाचा पर्यटन दृष्टीने विकास व्हावा. पर्यटन विभागाकडून निधी मिळवून जंगलात वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन करतांना पर्यटन वाढीसाठी, धुळे जिल्ह्याचा विकासासाठी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर्व धुळेकर बांधवांनी लळींग ट्रेकिंगचा आनंद घ्यावा यासोबत वनसमितीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तेथील सर्व कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक अधिकारी माणिक भोसले आणि युवासेना जिल्हाप्रमुख ऍड. पंकज गोरे यांनी केले.

प्रस्तावित जंगल फेरी पार्क

पर्यटन विभागाकडून जंगल फेरी पार्क या प्रस्तावाला मंजुरी मिळेल त्यापूर्वी तेथे ट्रेकिंग सुरू करण्यात आले आहे. लळिंग किल्यापासून काही अंतरावर असलेल्या दोन डोंगरात त्या दोघा डोंगराचे नाव एकाचे टाक्या आणि दुसर्‍याचे नाव मदाशा असे असून त्या दोन डोंगरांच्या मध्ये श्री शंकर भगवानाची २५२ फूट भव्य मूर्ती बसविणे, त्या मूर्तीवर कथा रहित लेसर लाइट शो, त्या डोंगराच्या आजूबाजूला त्यासह १५०० एकर जमिनीवर वेगवेगळ्या ठिकाणी बोटनिकल गार्डन, रॉक गार्डन, बर्ड गार्डन, केक्टस गार्डन जंगल फेरी, फ्लावर / रोझ गार्डन, प्राणी संग्रालय, मत्स्यालय, रेस्क्यू सेन्टर, मिनी
ऍपिथेटर ज्यामुळे नागरिक निसर्गाच्या प्रेमात पडतील, लहान मुलांसाठी खेळणे, ऐतिहासिक वास्तूंचे देखावे आदींचा समावेश जंगल फेरी पार्क मध्ये असेल.

या संदर्भात लवकरच पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर जंगल फेरी पार्कचा आरखडा सादर केला जाणार आहे.

धुळे शहरालगत गट नंबर २८३, २८४ आणि २८५ अशा तीन गटामध्ये जवळपास ६०० हेक्टर विस्तार असलेले लळींग कुरण परिसर आहे. या परिसरात बिबट्या, तरस, काळवीट, ससा, मोर, लांडोर, हरीण असे वन्यप्राणी तसेच वन्यपक्षाचा वास आहे. या लळिंग जंगलाचा सर्वागिन विकास व्हावा, या परिसरात रस्ते, पाणवठे निर्माण करण्याबरोबर वृक्ष लागवड करत परिसरात अधिकाधिक समृद्ध करत, पर्यटनच्या दृष्टीने विकास होऊन उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे जंगल फेरी पार्क उभे करून धुळ्याचा विकास व्हावा, तेथील परिसरातील आजुबाजुच्या गावकरीं स्थानिक बांधवांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे यांचे प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here