एका तासात आरक्षण फुल्ल झाल्याने कोकणवासीयांची मागणी

Twitter :@maharashtracity

मुंबई: मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनी शुक्रवारी आरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता १७ सप्टेंबर रोजीचे रेल्वेचे आरक्षण काही वेळेतच फुल्ल झाले. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या  रेल्वे गाड्यांमध्ये देखील आता गणपतीसाठी जाण्याच्या कालावधीतील एकही आरक्षित तिकीट शिल्लक नसल्याच्या सुचना देण्यात आल्या. यामुळे कोकणवासीय संतापले असून त्यांना आता १२० दिवस आधीचे आरक्षणची अट नको असल्याचे सांगत पंधरा दिवसांचा नियम ठेवण्याची मागणी केली जात आहे. 

यावर चाकरमान्यांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. शिव प्रेरणा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नालासोपारा उप विभाग संगटक राजेश राणे यांनी सांगितले की, चाकरमानी कोकण रेल्वेने मुंबई ते कणकवली अथवा कुडाळ असा प्रवास करतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून एप्रिल, मे महिना किंवा गणपती असो अथवा मधल्यावेळी सुद्धा रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळत नाहीत. १९ मे आम्ही सकाळी ८ वाजल्यापासून गणपती सणाला जाण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर रोजीच्या तिकीट काढण्याचा प्रयत्न केला असता सर्व गाड्या रिग्रेट दाखवतात. यावरुन काळाबाजाराचा संशय असून १ मिनिटात सर्व गाड्या फुल होवू शकत नाहीत. या संशयामुळे १२० दिवस अगोदर आरक्षणाची अट रद्द करून १५ दिवस करावी. कारण नोकरदार किंवा व्यावसायिक चाकरमानी १२० दिवस आधीच गावाला जाण्याचे आणि येण्याचे नियोजन कसे बरे करु शकेल, असा प्रश्न राजेश राणे यांनी उपस्थित केला. यातून कित्येक वेळी अडचणींमुळे तिकीट रद्द कराव्या लागतात. रेल्वे मंडळ रद्द करण्याचे पैसे घेतात. शिवाय ४ महिने पैसे वापरानंतर व्याज काही देत नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. एकंदरीत रेल्वे आरक्षणाचा कालावधी कमी करावा अशी मागणी करण्यात येऊ लागली आहे. दरम्यान कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात फुल्ल होत असतील तर हे आरक्षण नेमके कोण करते? तसेच यामागे कोणता गट सक्रिय आहे का असा संशयित सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here